जळगाव । वन विभागाच्या यावल वनपरिक्षेत्रांच्या फिरत्या गस्त पथकाने अडावद येथील बस स्टॅन्ड परिसरातील एका राहत्या घरात धाडसत्र अवलंबित 675 नग सागवानी बेलनसह ते बनविण्यासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रीक मोटार असा एकुण 12 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले. याघटनेमुळे सागवान तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी एम.डब्लू. जाधव यांच्या पथकाने ही धडक कारवाही केली.
675 बेलनची किंमत 9 हजार
अडावद येथील बसस्थानका शेजारील यावल -चोपडा रस्त्यावरील एका धरात सागवानी बेलन (लाटने) बनविले जात असलयाची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून गस्ती पथकाने सापळा रचला. त्यावरुन शुक्रवारी 10 रोजी फिरत्या गस्ती पथकाने धाडसत्र अवलंबित 150 नग विना तयार केलेल तसेच 525 नग तयार असे एकुण 675 नग बेलन सुमारे 9 हजार 300 रुपये किमतीचे साग जप्त कले. तसेच 3 हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रीक मोटार ही हस्तगत करण्यात आली असून ही कारवाई चोपडा वन विभागाच्या हद्दीत करण्यात आली आहे.
गस्ती पथकाची कारवाई
संशयीताकडील कागदपत्रांची पडताडणी करुन या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. ही धडक कार्यवाही यावल वनपरिक्षेत्राच्या फिरत्या गस्ती पथकाचे प्रमुख एम. डब्यू. जाधव वनक्षेत्रपाल संजय साळुंखे, बनपाल ए.के.पाटील, वनरक्षक शिवाजी माळी, जे.व्ही ठाकरे, संदिप पंडीत, विजय माळी, वाय.डी. तेली, वनमजूर पी.पी. कोळी, संजय माळी, भागिरथ पवार आदींनी केली.