अडावद येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0

अडावद- गावातील वरचा माळी वाडा भागातील राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीवर गावातीलच एक नराधमाने महिन्याभरापुर्वी अत्याचार केला. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तरुणावर अडावद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत महिती अशी की, अडावद येथील पीडीत मुलीला आरोपी तुषार एकनाथ माळी रा. अडावद योन १३ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसतांना बळजबरी करत बलात्कार केला. त्यानंतर ही घटना कोणाला सांगू नको असे सांगत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. घाबरून अल्पवयीन मुलीने हा प्रकार सांगितला नाही. मुलीला दिवस गेल्याचे पीडीत मुलीच्या आईला समजल्यानंतर त्यांनी अडावद पोलीस स्टेशन गाठत हा प्रकार सांगितला. पीडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी तुषार एकनाथ माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.