जळगाव । चोपडा तालुक्यातील अडावद येथे एका इसमाकडे गावठी कट्टा बाळगुन असल्याची माहिती एलसीबीला मिळाली.मिळालेल्या माहितीवरून अडावद रोडवरील एका हॉटेल समोर त्या इसमास एलसीबीच्या पथकाने गावठी कट्ट्यासह जेरबंद केले. एलसीबीच्या पोलिस निरिक्षक चंदेलसिंग यांना गुप्त माहिती मिळाली की अडावद यावल रोडवरील शुभम हॉटेल समोर आरोपी अफजलखा ताहेरखा पठाण यांच्याकडे गावठी कट्टा आहे.
त्याठिकाणी आरोेपी अफजलखा ताहेरखा पठाण (वय37) हा फिकट गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला उभा होता.त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकमरेला 25 हजार किमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा व 2 हजार रूपयांचे जिंवत काडतुस मिळाले. याप्रकरणी अडावद पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.
एलसीबीचे सपोनि सागर शिंपी, स.फै मनोहर देशमुख, मुरलीधर आमोदकर, हेकॉ दिलीप येवले, रविद्र गायकवाड, सुभाष पाटील, रमेश चौधरी, महेद्र पाटील,मिलीद सोनवणे, रामकृष्ण पाटील, गफ्फार तडवी, विनायक पाटील, योगेश पाटील, मनोज दुसाने, सुशिल पाटील, महेश पाटील दिपक पाटील, प्रविण हिवराळे, यांनी टिमने अडावद -यावल रोडवरील हॉटेल शभुम येथे सापळा लावला.