अडावद येथे लग्नात मुशायराचे आयोजन

0

अडावद । येथील उर्दू हायसकूलचे उपाध्यक्ष जहिरोद्दीन शेख हाशम यांच्या मुलाच्या लग्नाच्या प्रसंगी 9 डिसेंबर रोजी अडावद येथे मुशायरा(कवी संमेलन)चे आयोजन केले आहे. या कवी संमेलनात नामवंत शायर हामीद भुसावली, कमाल अन्सारी कुवैत, सोहेल आजाद, मुश्ताक अहेमद मालेगाव, फारुक रजा शेगाव, नसीम नवाज अजणगाव, अजीम रायपुरी, मुजावर मालेगावी, मुबीन राही, फराज रिजवी, जमीर अडावदी, शाद भुसावली, इलियास अब्बासी, युनूस अंजर चोपडा, महेमुद नजर चोपडा, शाहिद मुफट, हारून उस्मानी भुसावल, एजाज शेख यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील चाहत्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन हाजी शेख कबीरोद्दीन, पत्रकार रियाज शेख, जहागीर मेंबर, अरशद सैय्यद, अजहर शेख, मजहर शेख, अशपाक हुसेन, रईस काशीब या आयोजकांनी केली आहे.