अडावद येथे शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

0

अडावद । अडावद येथील अँग्लो उर्दु हायस्कुलमध्ये शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संस्था अध्यक्ष हाजी फजल सेठ, सचिव सईद खान इब्राहिम खान व शालेय समितीचे चेअरमन अय्यूब खान यांच्याहस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्य सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्यात नेतृत्व गुण वाढवावे, खेळाडुवृत्ती निर्माण व्हावी या उद्देशाने शासनाकडून दरवर्षी पावसाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते.

खेळा विषयी केले मार्गदर्शन
या स्पर्धेत फुटबॉल, बुद्धिबळ, कबड्डी, खो-खो, कुस्ती, क्रिकेट, व्हॉलीबॉल, तायक्वांदो, कराटे, मैदानी स्पर्धा आदी खेळाचा समावेश असून विद्यार्थ्यांना या खेळाकरीता तयार व्हावे, हा उद्देश असल्याने विविध खेळातील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापक पटेल यांनी ‘खेळ व खेळाचे महत्व’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नाणे फेक करून समान्यांना सुरूवात झाली.