अडावद। अडावद पोलिस स्थानकातर्फे गणेशोत्सव व बकरी ईदनिमित्ताने शांतता समितीच्या बैठक शनिवार 19 ऑगस्ट रोजी घेण्यात आली होती. या बैठकीत दोन सदस्यान मध्ये झालेला वाद हा रविवार 21 ऑगस्ट रोजी संध्याकाळी चव्हाट्यावर आला. 22 ऑगस्ट रोजी परत काही सदस्यांनी पुन्हा जमवा जमव सुरू केली आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि दोघांची समजूत काढली आणि ह्या चव्हाट्यावरच्या वादाला मिटवल्या सारखा मिटवण्यात आला. हा वाद वर्चसवाचा वाद तर नाही शांतता समिती सदस्यच जर वाद करतील तर गावात शांतता कसी राहील, अशी चर्चा गावात सद्या सुरू आहे.
बैठकीत एका विषयावरून चिघळला वाद : शांतता समितीची बैठक सुरू होती. या बैठकीत काही मान्यवर आपल्या भाषणात बोलत होते की दोन्ही सण एकाच वेळी आले आहेत तर आपल्याला दोन्ही सण हे ऐकोप्याने पार पाडायचे आहेत आणि आपल्या गावाची शांतता कसी राखावी अश्या विविध विषयांवर मान्यवर बोलत होते. एका सदस्याने विषय काढला की, शांतता कसी राहील गावात किरकोळ भांडण ही झाली की नाही झाली तोपर्यंत पोलीस ठाण्यात भांडण करणार्याचे पाहिले त्यांना सोडवणारे पुढारी येथे येऊन गर्दी करतात आणि खुर्च्यांवर येऊन बसून राहतात. पोलिसांनी कार्यवाही करू नये, असा आग्रह करतात म्हणून भांडण करणार्यांवरचा वचक कमी होत चालला आहे. असे बोलण्याचा एका सदस्यला राग आला व ते त्यांना प्रती उत्तर द्यायला लागले. परंतु तिथे तो वाद मिटवून बैठक शांततेत पार पडली. परंतु आतून खद खद व घुस फूस दुसर्या दिवशी ही सुरूच होती.
आपापसात मिटविला वाद
काही सदस्यांना माहिती पडल्यावर हा वाद त्यांना समोरा समोर बोलून एकमेकांची समजूत करून देऊ असा विचार करून त्या दोन्ही सदस्यांना बोलवले व आपसातील जो वाद आहे. तो तुम्ही दोघांनी मिटवून घ्यावा अशी आमची विनंती आहे. असं त्यांना समजून घेण्याचा पर्यंत चालू असतांना पुन्हा वाद हा वाढला तर इतका वाढला की, एकमेकाच्या अंगावर धावून गेले शिवीगाळ पर्यंत पोहोचले एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. मात्र काहीच्या मध्यस्थी मुळे वादावर पडदा टाकण्यात आला.