अडावद शिवारात घातपात का नरबळी?

0

चोपडा । सध्या पैशाच्या मोह हा कोणालाही आवरला जात नसतो म्हणून सर्वसामान्य व श्रीमंत लोकांना गर्भ श्रीमंत होण्याचे स्वप्न पहात असतात. त्यासाठी भगत अथवा जादुटोना करणारे यांना हाताशी धरून पैसे कसे कमवता येतील याची शंक्कल लढवण्यांची संख्या ही या धरतीवर कमी सापडणार नाही. त्यासाठी लहान बालकाच्या देखील बळी देण्यात आल्याचे प्रकार राज्यासह जिल्ह्यात अनेक घटना पहावयास मिळालेल्या आहेत. असाच प्रकार तालुक्यातील अडावद शिवारात घडला असल्याची चर्चा सुरू आहे.

खड्ड्यावरून नागरीकांमध्ये तर्कवितर्क

सातपुडाचा पायथ्याशी वनविभागाचा हद्दीला लागुन नथ्थु भिल यांचे शेत लागुन आहे. या शेतात बुधवार रोजी 5 फुट लांब तर रुंदी 3 व खोल 5 फुट असा खड्डा खोदण्यात आलेला होता. परंतु उनपदेव फिटर आठवड्यातून सोमवार ते गुरुवार या 4 दिवस दिवसाला विद्युतपुरवठा सुरू असतो. त्यामुळे दिवसाला पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी वर्ग शेतावर असतात म्हणून गुरुवारच्या रात्रीला या शेतावर खोदण्यात आलेला खड्डा जवळ नारळाचे कुच्चा, अगरबत्ती, अंंड्डे घटनास्थळी दिसुन आले आहेत. खड्ड्यात कुठल्या प्रकारची पुजाअर्चा का करण्यात आली? धनप्राप्तीसाठी तर नरबळी देण्यात आली नसावी? का अनैतिक संबंधातुन कुणाच्या खुन करून पुरावा नष्ट करून खड्यात पुरण्यात आले, असे तर्कविर्तक लावण्यात येत आहे. हा प्रकार नेमका कुणी व कशासाठी करण्यात आला आहे. याचा तपास खड्डा उकरून त्यात काय आढळून येईल. याचा तपास पोलिसांनी तात्काळ करावा अशी मागणी परीसरातून होत आहे.