मुंबई । पेट्रोलच्या वाढत्या दरांनी वाहनधारकांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेलचे दर दररोज बदलत असल्याने ही दरवाढ ग्राहकांच्या चटकन लक्षात येत नसली तरी मागील अडीच महिन्यात पेट्रोलचे दर तब्बल 16 रुपयांनी वाढले आहेत. 1 जुलै 2017 रोजी पेट्रोलचा दर 63 रुपये लिटर होता.
10 सप्टेबर 2017 रोजी 79 रुपये लिटर तर मागील 72 दिवसात पेट्रोलमध्ये 16 रुपयांची दरवाढ झाली आहे. यामुळे वाहनधारकांचा खिसा मात्र खाली होत आहे. 1 जुलै रोजी 63 रुपये प्रती लिटर असलेल्या पेट्रोलचा दर 15 जुलै रोजी 65 रुपये, 1 ऑगस्टला 67 रुपये, 15 ऑगस्टला 70 रुपये, 1 सप्टेंबरला 75 रुपये आणि 10 सप्टेंबरला 79 रुपये प्रती लिटर होता. या दरवाढीमुळे वाहनधारकांचे कंबरडे मोडले आहे.