अडीच लाखांचा माल जप्त

0

पुणे । फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच आरोपींना दरोडा प्रतिबंधक पथकाने रविवार पेठ येथून अटक केली. या कारवाईत त्यांच्याकडून तब्बल अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

उत्तमकुमार माली (30), भैरुलाल रावल (20), शंभुशिंग शिंदल (21) जितेंद्र राजपूत (22), जितेंद्र राठोड (24) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना दरोडा प्रतिबंधक पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने संशयित आरोपींना कस्तुरे चौक, रविवार पेठ हद्दीमधून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिली. कारवाईत त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटार सायकल एक पिस्टल व चार लाइव्ह राउंड एक धारधार सुरा, 6 मोबाइल, बासष्ट हजार रोख रक्कम, 2 कुरियर पार्सल, असा एकूण 2 लाख 54 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. ताब्यात घेण्यात आलेले पाचही आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईकरिता फरासखाना पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आलेले आहे.