अडीच लाखाचा अवैध लाकडाचा मुद्देमाल सापडला;

0

वन विभागाची एकावर कारवाई

नवापूर। गणेश रणदिवे सहाय्यक वन संरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा व वनक्षेञपाल आर.बी. पवार, वनपाल पी. बी. मावची, आर.बी.जगताप,एम.जे.मडलीक, पी.एस. पाटील, नंदुरबार नवापूर चिंचपाडा रेंज स्टाफ यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून नवापाडा येथील संशयित आरोपी यांच्या घराची भारतीय वनअधिनियम १९२७ कलम ७२(C) अन्यवे वाँरटने झडती व घराची तपासणी केली असता घरात जाऊन अवैध ताजा तोडीचे साग साईज, सिसम साईज, पायउतराई, तयार सोपा सिसमच्या सेट, टेपाई, रंधा मशिन,पाइउतराइ मशिन, सुतार साहित्य आदी वस्तु अंदाजे २ लाख ५० हजार रुपयाच्या माल आढळुन आले. माल भारतीय वन अधिनियम 1927 कलम 52 अन्वये जप्त करून खाजगी वाहनात भराइ करुन शासकीय विक्री आगार नवापुर येथे जमा केले. गुन्हे कामी वनपाल कामोद यांचा प्रथम गुन्हा नं. 03/2020 दिनांक 07/04/2020 रोजीचा आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. कार्यवाही नवापूर, चिंचपाडा रेजट्रोप,नंदुरबार रेंज स्टाफ यांनी केली असुन उपवनसंरक्षक नंदुरबार व वनविभाग शहादा, विभागीय वनअधिकारी दक्षता विभाग धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

नवापूर तालुक्यात लाकुड तस्करीयांविरुद्ध ही सहावी कार्यवाही असुन यापुढे पण अशी कार्यवाही सुरु राहणार आहे. तसेच स्थानिक व ग्रामस्थांना काही लाकुड तस्करी अथवा अवैध मुद्देमालबाबत माहीती असल्यास तत्काळ कळवावे. तसेच मालकी अथवा शेतात खैर, साग,सिसम, इत्यादी वृक्षाची तोड झाली असल्यास वनविभाग नवापूर,चिंचपाडा, नंदुरबार येथे कळवावे जेणे करुन कायदेशीर कार्यवाही होईल. नवापाडा येथे केलेल्या कारवाईत संशयित आरोपी विरुध्द भारतीय वनअधिनियम १९२७महाराष्ट्र वन निमावली २०१४ व महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६४ अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे गणेश रणदिवे (सहायक वनसंरक्षक, नंदुरबार)यांनी सांगितले.