अडीच लाख कुटुंब शौचालय वापरीत नाही

0

जळगाव : जिल्ह्यातील 2 लाख 32 हजार 483 कुटुंब वैयक्तिक शौचालयाचा वापर करीत नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. केंद्र व राज्य सरकारने स्वच्छ भारत मिशन हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबविला असून शौचालय बांधकामाच्या कामास गती मिळावी यासाठी वार्षीक कृती आराखडा तयार करुन प्रत्येक तालुक्याने दहा हजार शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट ठरवून हगणदारी मुक्त करावे असे आदेश अधिकार्‍यांना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रयाग कोळी यांनी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत दिले. दुषीत पाण्यामुळे नागरिकांना पोटाचे आजार उद्भवत असून लाखो रुपयाची योजना मंजुर करण्यात आल्य परंतु किरकोळ कारणास्तव त्या रखडल्या असा प्रश्‍न जिल्हा परिषद सदस्यांनी यावेळी उपस्थित केले. अधिकार्‍यांनी गावोगावी जावून कामाचा आढावा घेऊन लवकर कामे मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले.