चेन्नई : अण्णाद्रमुकच्या १८ आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णया विरोधातील याचिकेवर आज मद्रास उच्च न्यायालयाकडून निकाल दिला आहे. तामिळनाडू विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कायम ठेवत आमदारांना अपात्रच ठेवले आहे. या निर्णयामुळे अण्णाद्रमुकला मोठा धक्का बसला आहे.
या १८ आमदारांनी शशिकला- दीनकरन गटाचे समर्थन केले होते. यामुळे तत्कालीन विधानसभा अध्यक्ष पी. धनपाल यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली या आमदारांना अपात्र ठरविले होते. याविरोधात हे आमदार मद्रास उच्च न्यायालयात गेले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तिसरे न्यायमूर्ती सत्यनारायण यांची नियुक्ती केली होती. 12 दिवस चाललेल्या सुनावणीनंतर सत्यनारायण यांनी ३१ ऑगस्टला यावरील निकाल राखून ठेवला होता. या आमदारांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अपात्र ठरविण्यात आले होते.