पिंपरीः साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्याचे नियोजन करण्यासाठी येत्या सोमवारी (दि.16) पदाधिकारी, नगरसेवक, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली. पुढील महिन्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. कला व सांस्कृतिक धोरणा अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने अण्णाभाऊंची जयंती साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात पदाधिकारी, नगरसेवक, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन, महापौर नितीन काळजे यांनी केले आहे.