अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा

0

शहादा । येथील पी. के. अण्णा पाटील फाऊंडेशन आणि पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त 18 सप्टेंबरला सामुहिक श्रध्दांजली आणि विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन पुरूषोत्तम वत्त्कृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. परिसराचे भाग्यविधाते सहकार महर्षी स्व. अण्णासाहेब पी. के. पाटील यांचा 18 सप्टेंबर हा तृतीय स्मृती दिन. त्या दिवशी संस्थेच्या प्रांगणातील स्व. पी. के. अण्णा पाटील यांच्या स्मृतीस्थळी सकाळी आठ वाजता सामुहिक श्रध्दांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

प्रथम तीघांसह उत्तजनार्थ रोख बक्षीसे
स्पर्धेसाठी कर्जमाफी नको- हमी भाव द्या, चळवळीत हवे संयमाचे भान, आपण खरच आधुनिक आहोत का?, न्याय व स्वातंत्र्य- प्रत्येक व्यक्तीचा मुलभूत हक्क, स्त्री पुरूष समानता- देशाची महानता हे पाच विषय आहेत. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ यशस्वी स्पर्धकांना अनुक्रमे दहा हजार, सात हजार, पाच हजार व प्रत्येकी एक हजार रूपये रोख रकमेची पारितोषिके दिली जाणार आहेत.

सहभागींना मिळणार प्रमाणपत्र
यातील निम्मे रक्कम संबंधित महाविद्यालयाला मिळणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष किशोर नरोत्तम पाटील, समन्वयक पी. आर. पाटील व प्राचार्य मकरंद पाटील यांनी केले आहे. संयोजन समितीचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ विश्‍वास पाटील, कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश शिंदे, प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. जीवन जगदाळे, प्रा. डॉ. विजयप्रकाश शर्मा हे स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रयत्नशिल आहेत.

उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष करणार
संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर विश्‍वेश्‍वरय्या सभागृहात 18 सप्टेंबराला सकाळी नऊ ते पाचच्या दरम्यान विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन पुरूषोत्तम वत्त्कृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण संस्थेचे अध्यक्ष दीपकभाई पाटील व मानद सचिव कमलताई पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी उमवि स्तरावरील महाविद्यालयांच्या विविध संघांनी नोंदणी केली आहे.