हडपसर । पुणे जिल्हा क्रीडा विभाग आंतर महाविद्यालयीन हँडबॉल (मुले) स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाने विजेतेपद संपादन केले.
पद्मिनी जैन महाविद्यालय पाबळ येथे झालेल्या पुणे जिल्हा क्रीडा विभाग आंतर महाविद्यालयीन हँडबॉल (मुले) स्पर्धेत अंतिम सामन्यात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाने आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचा (42-27) 15 गोलने सरळ पराभव केला. विजयी संघाकडून शुभम भाडळे याने 10 गोल, निखिल जाधव याने 9 गोल, अनिकेत डामसे 6 गोल, वैभव कोळी 6 गोल, सर्फराज पठाण 5 गोल कमलेश बिराजदार 4 गोल रोहन बिनवडे 2 गोल करत अप्रतिम खेळ केला. पराभूत संघाकडून शुभम शेवटे 17 गोल, रुपेंद्र साळवी 3 गोल, अनुपम आल्हाट 1 गोल करत चागली लढत दिली. उपांत्य फेरीत अण्णासाहेब मगर महाविद्यालयाने सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाचा (27-19) 8 गोलने सरळ पराभव केला.
पुणे जिल्हा क्रीडा विभागातर्फे अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा खेळाडू तुषार पाटील याचा उत्कृष्ट गोलकिपर व प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचा खेळाडू शुभम शेवटे याचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मान करण्यात आला.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार, राजेंद्र घाडगे, अॅड. संदीप कदम, मोहनराव देशमुख, एल.एम. पवार, ए.एम. जाधव, प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी, डॉ. भाऊसाहेब बेंद्रे, डॉ. आनंद महाजन यांनी अभिनंदन केले.