अण्णा बनसोडे-काळुराम पवार यांच्यात हल्लाबोल

0

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रविवारी पिंपरी-चिंचवड येथे हल्लाबोल आंदोलन होते. हे आंदोलन मावळण्याच्या आतच पक्षाचे माजी आमदार अण्णा बनसोडे व माजी नगरसेवक काळुराम पवार यांच्यात चिंचवडच्या चापेकर चौकात हाणामारी झाली.

या दोघांमध्ये आंदोलनातच वादाला सुरुवात झाली होती. मात्र त्यांनी अजित पवारांचे भाषण संपू दिले व घरी परतत असताना चापेकर चौकात हाणामारीला सुरुवात केली. दोघेही चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल झाले असून परस्पर विरोधी तक्रार देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.