अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

0

गराडे । जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आतकरवाडी (ता. पुरंदर) येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त या महापुरुषांच्या प्रतिमेला माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य बाबूसाहेब माहूरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी केंद्रप्रमुख राजेंद्र कुंजीर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमंत माहूरकर, विजय अधिकारी, संतोष शिंदे, सुरेश नवले, अरविंद अधिकारी, मनोज बांदल, प्रवीण बांदल, संदीप अधिकारी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी लोकशाहीर व लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली. आंतरजिल्हा बदलीने शाळेत नव्याने रूजू झालेले दत्तात्रय गोसावी व अपर्णा मदने या शिक्षकांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच आतकरवाडी शाळेला शाळा मूल्यांकनात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून दिलेले राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक अनंता जाधव यांना ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय पोमण यांनी केले.