पिंपरी-चिंचवड : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समिती संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीसाठी लवकरात-लवकर जागा देण्यात येईल, असे आश्वासन महापौर नितीन काळजे यांनी दिले आहे. याबाबत संस्थेचे अध्यक्ष संदिपान झोंबाडे व धनंजय भिसे यांनी माहिती दिली. जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत वल्लभनगर येथे असलेल्या हाफकीन संस्थेची पाच एकर जागा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समिती संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीसाठी मिळावी, अशी मातंग समाज बांधवांची जुनी मागणी आहे.
तीन वर्षांपूर्वीच प्रस्ताव मंजूर
महापालिकेच्या महासभेत ऑगस्ट 2014 मध्ये ही जागा मिळावी, अशा आशयाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. मात्र, हा प्रस्ताव मंजूर करण्याशिवाय अन्य कोणताही पाठपुरावा अथवा अन्य कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ही जागा मिळण्याचा प्रश्न अद्यापही रेंगाळला आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समिती संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी समिती अध्यक्ष संदिपान झोंबाडे, सचिव धनंजय भिसे, शिवसेना प्रभाग प्रमुख युवराज दाखले, मोहन वाघमारे, लहुजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतिश भवाळ, गणेश वैरागर, दादाभाऊ आल्हाट, सोपानराव चव्हाण, महाराष्ट्र दलित युवक महासंघ प्रमुख मारूती दाखले, भाजप शहर कार्यकारिणी सदस्य भगवान शिंदे, दशरथ कसबे, भगवान खुडे, सुरेश जोगदंड, शाहीर बापु पवार, अर्जुन नेटके, रामभाऊ भवाळ, शिवाजी गायकवाड, आण्णा कसबे, मिना कांबळे, के. वाय. कांबळे, भारिप बहुजन महासंघाचे मिलींद कांबळे, दीपक चकाले, प्रल्हाद कांबळे, नितीन चंदनशिवे, बिभीषन कांबळे आदी उपस्थित होते.
उपोषणस्थळी भेट
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष शरद म्हस्के, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मारुती भापकर, राष्ट्रवादीच्या नगरसेविका निकिता कदम, अनुराधा गोरखे, रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी उपोषणस्थळी भेट देत, या उपोषणाला पाठींबा जाहीर केला. याशिवाय भारिप बहुजन महासंघाने देखील या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला.
शिष्टमंडळाला आश्वासन
आंदोलनानंतर शिष्टमंडळाने महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठीच्या जागेची मागणी लवकरात-लवकर पुर्ण करण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी शिष्टमंडळाला दिले आहे. येत्या तीन महिन्यात ही मागणी पु्र्ण करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा संस्थेने इशारा दिला आहे.