अतिंद्रिय विज्ञानाला शास्त्रोक्त पद्धतीने समजून घेतले पाहिजे – डॉ. मेहरा श्रीखंडे

0

अतिंद्रिय विज्ञानाला शास्त्रोक्त पद्धतीने समजून घेतले पाहिजे व त्याच्यावरील शास्त्रीय संशोधन करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन या विषयात शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करण्याचा लौकिक असलेल्या डॉ. मेहरा श्रीखंडे यांनी म्हटले आहे.

त्यांचे या विषयावर प्रकाशित झालेल्या इंग्रजी व मराठी पुस्तकाला वाचकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या वाचकांच्या संवादात त्या बोलत होत्या. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅरॉनॉर्मल सायन्सच्या वतीने मुंबई त्याचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी त्यांना या विषयावरील संशोधनात्मक कार्याबद्दल अनेक पुरस्कारदेखील मिळालेले आहेत.

विदेशात या विषयावर अधिकाधिक संशोधन होत असून भारतात मात्र त्याच्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. विश्वातील काही गूढ विज्ञानाला आपण आत्मसात केले पाहिजे व त्याच्याशी जवळीक करत मानवतेच्या भरीव कल्याणासाठी उपयोग केला पाहिजे, समाजातील अशा वेगळ्या विषयावर मानवतेसाठी कार्य करणा-यांना सन्मानित करून प्रोत्साहित केले तर याबाबतच्या वैचारिक चळवळीला बळ मिळू शकेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

मेहरा श्रीखंडे यांनी वेगवेगळ्या व्यासपीठांवर तसेच माध्यमातून त्यांनी सातत्याने प्रचार केला आहे. पॅरानॉर्मल एक्सपेरियन्सेस या विषयावरील त्यांनी प्रसिद्ध केलेले अभ्यासपूर्ण पुस्तक देशभर लोकप्रिय झाले. त्याचा मराठी अनुवाद देखील प्रकाशित झाला असून नुकतेच ई बुक स्वरुपातदेखील ते उपलब्ध करण्यात आले आहे. भारतातदेखील अभ्यासकांनी पुढे येऊन या विषयावर अधिक व्यापकतेने अभ्यास केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यासंदर्भात व्यक्त केली आहे.