अतिउत्साहात कायदा धाब्यावर

0

जळगाव: ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद प्रथमच मिळालेले जिल्ह्यातील शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचे बुधवारी, जळगाव शहरात आगमन झाले. मंत्रिपद मिळाल्यानंतर ते येत असल्याने त्यांच्या स्वागताचा अथांग उत्साह कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळाला. पण या नादात कायद्याचे उल्लंघनही केले गेले. एका वाहनाच्या समोरील काचेवर ‘मंत्री महोदय’, असे मोठ्या अक्षरात लिहून त्यासोबत नेत्यांचे फोटोही डकविण्यात आले होते. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांना कळत नसले, तरी या कायदेभंगाकडे जळगावच्या पोलिसांनी सपशेल दुर्लक्ष केले. एरवी सर्वसामान्याला छळणारे पोलीस आजच्या प्रसंगात मात्र, मूग गिळून गप्प बसले होते. हेच का ते ‘सरकार’ म्हणावे?