28 अतिक्रमणधारकांची उपस्थिती; सहकार्य करण्याचे आवाहन
शिंदखेडा । कृषी उत्पन्न बाजार समिती शिंदखेडा येथे 28 अतिक्रमण धारक, बाजार समिती चेअरमन व संचालक यांची बैठक संपन्न झाली. याप्रसंगी चेअरमन नारायण पाटील, संचालक मोतीलाल पाटील, सर्जेराव पाटील यांच्रासह सर्व संचालकांची उपस्थिती होती. शिंदखेडा कृषी उत्पन्न बाजार समितीला लागून पूर्वेकडे एकूण 28 अतिक्रमण धारकांचे विविध व्यावसायिक दुकाने आहेत. अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढावे या बाबत बाजार समितीने अनेकदा नोटीसा बजावल्या आहेत. अखेर हे प्रकरण न्रारालरात गेले आहे. निकालाची टांगती तलवार अतिक्रमण धारकांवर आहे. अतिक्रमण धारकांनी एकत्रीत येऊन बाजार समिती चेअरमन व संचालकांची भेट घेतली.
न्याय मिळवून देण्याची मागणी
बाजार समितीने सहकार्य करावे अशी भूमिका अतिक्रमण धारकांनी या बैठकित मांडली. अतिक्रमण प्रकरण न्यायालत गेल्रामुळे वेळ व पैसा वाया जात आहे. न्रारालरीन खर्च करणे परवडत नसल्राची भूमिका अतिक्रमणधारकांनी मांडली. या परिस्थितीचा विचार बाजार समितीच्या पदाधिकार्यांनी करावा व अतिक्रमणधारकांना सहकार्य करुन न्रार देण्रात रावे अशी मागणी अतिक्रमण धारकांनी केली आहे. अतिक्रमणाचा प्रश्न पणन महासंघसमोर मांडली जाईल त्यांच्याशी चर्चा केली जाईल असे आश्वासन चेअरमन पाटील यांनी दिले. पणन महासंघाच्या माध्यमातून व्यापारी गळ्यांची परवानगी घेऊन निश्चित मार्ग काढला जाईल असा सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याने अतिक्रमण धारकांनी समाधान व्यक्त केले आहे.