जळगाव: शहरातील पांझरापोळ संस्थान कॉम्प्लेक्स येथी शान ऑटो दुकानासमोरील अतिक्रमण काढत असता त्यास विरोध करुन अतिक्रमक काढण्यास आलेल्या अतिक्रमण कर्मचार्यास मारहाण करुन इतरांना अरेरावीची भाषा वापरुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना मंगळवारी दुपारी 12.40 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी गणपतीनगरातील 9 ते दहा जणांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा यासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकारादरम्यान एकाने उपायुक्तांना लाच देण्याचाही प्रयत्न केला.
अतिक्रमण काढत असतांना वाद घालत दुकानदार निखिल पोपली, अशोक विष्णुमल पोपली, राजेश अशोक पोपली, जगदीश अशोक पोपली, दिपक नंदलाल पोपली, करतार पारपयानी यांनी अतिक्रमण पथकातील संजीव परदेशी, साजिदअली सैय्यद यांना मारहाण करत कपडे फाडले. अतिक्रमण काढण्यास आल्यास तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी सर्व जमलेल्या दुकानदारांनी महापालिकेच्या अधिकार्यांसह कर्मचार्यांना दिली. याप्रकरणी कर्मचारी संजीव परदेशी यांच्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे करीत आहेत.