अतिक्रमण काढण्यास सुरुवात

0

जळगाव। महामार्ग प्राधिकरण व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवारी खोटे नगर स्टॉपपासून महामार्ग व समातंर रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. पहील्याच दिवशी खोटे नगर स्टॉपवर टपरी काढण्यास व शिवसेनेची कोनशीला काढतांना विरोध झाल्याने वाद झाला व त्यामुळे गर्दी झाली होती. दुपारपर्यंत कारवाईत 12 टपर्‍या, हातगाड्या फलक काढण्यात आले होते.

शहरातील समांतर रस्त्यांसाठी महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील अतिक्रमण काढण्याच्या निर्णय घेतला आहे.सोमवारी सकाळपासून महापालिका व महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्गाच्या अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. सकाळी 8 वाजता खोटे नगर स्टॉपासून या मोहीमेस सुरुवात करण्यात आली. खोटेनगर स्टॉपवर समातंर रस्त्यात असलेली कोनशिला काढतांना सनेचे पदाधिकारी कुलभुषण पाटील यांनी देखील तुम्ही काढू नका आम्ही स्वत: नंतर काढून घेवू अशी भुमिका घेतली. यावेळी देखील सेनेचे कार्यकर्ते व अतिक्रमण पथक समोरा समोर आले होते. डिवायएसपी सचिन सांगळे यांनी समजूत घातल्यानतंतर कोनशिला काढून कुलभूषण पाटील यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.

कारवाईचा धसका अन् स्वत:हून काढल्या गाड्या
खोटे नगर स्टॉपवरील सुमारे 7 टपर्‍या, त्यापुढे असलेल्या 3 टपर्‍या, असंख्य फलक तसेच खोटे नगर व गुजराल पेट्रोलपंप दरम्यान असलेल्या सिमेंटच्या टाईल्स कारखान्यांच्या समातंर रस्त्यावर ठवलेल्या फरश्या देखील अतिक्रमणाच्या कारवाईत जप्त करण्यात आल्यात. कारवाईचा धसका घेवून शिव कॉलनी स्टॉपवरील हातगाड्यास्वत:हून काढून विक्रेत्यांनी काढून घेतल्या.

टपरी काढण्यावरून वाद
खोटनगर स्टॉपवरील नातेवाईकाची अतिक्रमीत टपरी काढळ्यामुळे माजी नगरसेक व नगरसेविका शितल चौधरी यांचे पती मनोज चौधरी यांनी विरोध केला. आम्ही स्वत: काढत त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी अतिक्रमण पथकाशी त्यांची शाब्दीक बाचाबाची झाली. यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी मधस्थी केल्यानतंर ही टपरी हटविण्यात आली. याठिकाणी तालुका पोलिस ठाण्याचा दिशादर्शक फलक देखील अतिक्रमण पथकाने काढला. त्यासह स्टॉपवर असलेले एल.के. फाऊंडेशनच्या वाचनालयाचा सांगाडा देखील काढण्यात आला. तसेच येथे असलेला बसस्टॉप देखील जेसीबीच्या साह्याने काढला.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त
अतिक्रमणाच्या कारवाईसाठी महापलिकेचे अतिक्रमण पथकात व अतिरिक्त मजूर असे 50 जणांचे पथक, नाहीचे 2 व मनपाचे 2 जेसीबी, 5 टॅक्टर, 1 ट्रक अशी यंत्रणा होती. या मोहीमेसाठी आयुक्त जीवन सोनवणे, डिवायएसपी सचिन सांगळे, न्हाईचे अधिकारी अरविंद काळे, अरविंद गंडी, रविंद्र इंगोले, मनपार अतिक्रमण अधिक्षक एच.एम.खान, सर्व बांधकाम अभियंते, नगररचना विभाग अभियंते, पोलिस निरिक्षक व पोलिस पथक असा फौजफाटा होता.