अतिक्रमण नियमित करण्यासाठी रीपाइंचा फैजपूर प्रांत कार्यालयावर मोर्चा

रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात फैजपूर प्रांत कार्यालयावर मोर्चा

फैजपूर : यावल तालुक्यातील अकलूद-कासवा गावातील अतिक्रमण नियमित करण्याच्या मागणीसाठी रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी व रीपाइं अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष ईश्वर इंगळे यांच्या नेतृत्वाखाली फैजपूरात मोर्चा काढण्यात आला. फैजपूर शहरातील सुभाष चौक येथून ते प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा निघाला.

गायरान जमीन दिली कशी ?
अकलूद, ता.यावल येथील सरकारी गट नंबर 68 वरील एकूण क्षेत्रफळ 2 आर.जमीन अर्चना नरेंद्र महाजन (भुसावळ) यांच्या नावावर शेती उत्पादनासाठी देण्यात आली आहे परंतु ही जमीन गायरान असून खडकाळ आहे. या जमिनीवर कुठलेही पीक घेतले जावू शकत नाही व शेतीही करता येणार नाही. अकलूद येथील रमाई आंबेडकर नगरात झोपडपट्टीत रहिवासी गेल्या 50 अतिक्रमणात राहत आहेत. शासनाने अद्याप त्यांचा पुनर्वसनाचा विचार केला नसल्याने त्याबाबत दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यांचा मोर्चात सहभाग
मोर्चात रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष ईश्वर इंगळे, सरपंच राहुल इंगळे, शांताराम तायडे, सुनील तायडे, पप्पू भालेराव, राजू तडवी, विष्णू पारधे, सुभान बिल, राजू कोळी, संतोष गुप्ता, गजानन अवजार, प्रमोद पाटील, याकूब तडवी, रमेश तायडे, संतोष बिल, महिला रजिया खाटीक, गुलशना तडवी, लता मेढे, सलीमा पिंजारी, साधना चंदनशीव, प्रभाबाई भालेराव, असंख्य रीपाइं कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.