जळगाव । शहरात दोन दिवसांपासून अतिक्रमण निर्मुलनाची कार्यवाही सुरू झाली असून ही कार्यवाही समान होत नसल्याचा आरोप खाविआ नगरसेवक नितीन बरडे यांनी स्थायी सभेत केला. याचा ठपका अधिकार्यांवर येत असल्याचे बरडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. ही सभा सभापती ज्योती इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी उपायुक्त चंद्रकांत खोसे, शहर अभियंता डी. बी. दाभाडे, प्रभारी नगरसचिव सुभाष मराठे उपस्थित होते.
उंदराने घेतला नगरसेवकाचा चावा
मनसे नगरसेवक अनंत जोशी यांनी आरोग्य अधिकार्यांवर कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अडचणी येत असतांना शहरातील सिनेमागृहातील उंदरांचा प्रश्न बिकट झाला असल्याचे सांगितले. त्यांना स्वतः याचा अनुभव आला असल्याचेही जोशी यांनी सांगितले. याबाबत त्यांनी सिनेमागृहाच्या कर्मचार्यांना विचारणा केली असता त्यांनी हे तेथे नेहमीच घडत असल्याचे सांगितले. आरोग्य अधिकार्यांनी उंदरांचा बंदोबस्त करण्राची मागणी यावेळी जोशी यांनी केली.
नगरसेवक डायरी केवळ नावालाच
नगरसेवक अमर जैन यांनी ते सभागृहात मांडत असलेल्या प्रश्नांवर कर्मचारी अधिकारी कार्यवाही करत नसल्याने आज जर प्रश्नांवर कार्यवाही होणार असेल तरच ते प्रश्न विचारतील असा पवित्रा घेतला. वार्डांत नगरसेवक डायरी सुरू करण्याची जैन यांनी स्थायी सभेत केली होती. या मागणीस चार महिने झाले तरी त्यावर कार्यवाही होत नसल्याने जैन नाराजी व्यक्त केली. काल त्यांचा वार्ड अंधारात होता अशी कैफीयत त्यांनी सभागृहात मांडली. नगरसेवक डायरीबाबत विद्युत विभागाचे एस. एस. पाटील यांनी पुढील सभेत आढावा मांडतो असे उत्तर दिले. कर्मचारी काम न करताच नगरसेवक डायरीवर सही घेवून जातात असा आरोप नगरसेविका वर्षा खडके यांनी केला. या आरोपांना उत्तर देतांना उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी नगरसेवक डायरी मेंटेन करून नोंद घेऊन आढावा संबंधीत अधिकार्यांकडे सादर करावी असी सूचना करत अन्यथा संबंधीत कर्मचारी, अधिकार्यांवर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा दिला.
अतिक्रमणावरून नगरसेवक आक्रमक
नितीन बरडे यांच्या आरोपाला उत्तर देतांना अतिक्रमण अधिक्षक ए.एम. खान यांनी मक्तेदाराची माणसे मिळाली नसल्याने अतिक्रमण निर्मुलन कार्यवाही सुरू झाली नव्हती ती आता 40 कर्मचारी मिळाल्याने सुरू झाली असल्याची माहिती सभागृहात दिली. यानंतर बरडे यांनी कार्यवाहीत भेदभाव करण्यात येत असल्याची विचारणा अतिक्रमण अधिक्षक खान यांना केली. याबाबत अतिक्रमण अधिक्षक खान यांनी कार्यवाहीत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यात येत नसल्याचे यावेळी स्पष्ट केले.
अधिकारी नगरसेवकांच्या प्रभागाबाबत अनभिज्ञ
जैन यांच्यावार्डात वर्कऑर्डर देवूनही कामास सूरूवात न झाल्याने अशा मक्तेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी केली. यावर शहर अभियंता डी.बी. दाभाडे यांनी त्याकामाचा फिड बॅक आलेला नसून कामाची मुदत बघतो असे मोघम उत्तर देत पुढील स्थायीत आढावा मांडणार असल्याचे सांगून नगरसेवक जैन यांना तुमचा एरिया कोणता अशी माहिती जाणून घेतली. यावर सभापती यांनी नाराजी व्यक्त करत अजूनही नगरसेवकांचा एरिया माहित नाही का असा खोचक प्रश्न शहर अभियंता दाभाडे यांना विचारला.
शिवाजीनगर दवाखान्यात पुरेशी औषधी उपलब्ध करा
नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी शिवाजी नगर येथील महापलिकेच्या दवाखान्यातील नेहमीच गैरहजर राहत असून दवाखान्यात पुरेशी औषधी नसल्याची तक्रार केली. तसेच शिवाजी नगर दवाखान्यात साफसफाई होत नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. याला आरोग्य अधिकारी रावलानी यांनी शिवाजी नगर दवाखान्यात तीन डॉक्टर, औषध उपलब्ध असल्याचे माहिती दिली. यावर दारकुंडे यांनी रावलानी जेव्हा व्हिजीटला येतात तेव्हाच कर्मचारी हजर राहत असल्याचा आरोप केला.