अतिक्रमण पथकातील 6 कर्मचारी निलंबित

0

जळगाव । महानगरपालिकेतील अतिक्रमण निर्मुलन पथकातील कर्मचारी हप्ते घेत असल्याची तक्रार आयुक्तांकडे आली होती. यावर आयुक्त जीवन सोनवणे यांनी अतिक्रमण पथकातील साजिद अली अबीद अली, मोहसनी शेख हमीद, मोहन गवळी, गिता अटवाल, आनंद गोयर, निलेश चव्हाण सहा कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

हाँकर्सकडून पैशांची मागणी करणे, दादागिरी करणे, माल परस्पर विक्री करणे व जप्त माल परत करण्यासाठी पैशांची मागणी करणे असे अरोप करण्यात आले होते.