अतिक्रमण विभागाची दुसर्‍या दिवशीही कारवाई

0

जळगाव । महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरात हॉकर्स विरोधी मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेनुसार बळीरामपेठेसह मध्यवर्ती बाजारपेठेतील रस्त्यांवरील हॉकर्सविरुध्द ही मेगा मोहीम उघडण्यात आली आहे. पहील्याच दिवशी सर्व रस्ते हॉकर्समुक्त केल्यानतंर आज देखील सकाळपासून या मोहीमेत रस्त्यावरील पक्के ओटे, टपर्‍या काढण्यात आल्यात. बळीरामपेठ, सुभाष चौक, शिवाजी रोडवरील हॉकर्सला स्थलांतरित करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. बळीराम पेठ, सुभाष चौक, शिवाजी रोड व टॉवर रस्त्यांवरील हॉकर्सला ख्वॉजामियाँ झोपडपट्टीच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत केले.

अतिक्रमण निर्मुलन मोहीम सुरुच
मात्र अपवाद वगळता भाजीपाला विक्रेते पुन्हा याच जागेवर व्यवसाय करीत होते. त्यामुळे काल 11 ते 25 सप्टेंबरपर्यंत 15 दिवसांची मेगा अतिक्रमण मोहीम महापालिका प्रशासनाने सुरु केली आहे. या मोहीमेत सर्व विभागांचे प्रमुख सहभागी झाले आहेत. तसेच 50 कर्मचार्‍यांचे पथक आहे. काल बळीराम पेठ, सुभाष चौक, शिवाजी रोड, शनिपेठ हा संपूर्ण भाग हॉकर्स मुक्त करण्यात आला. आज सकळापासून अतिक्रमण निर्मुलन मोहीम सुरुच होती. या मोहिमेचा धसका घेत अनेक हॉकर्सनी दुकाने लावलेच नाहीत तर काहींनी मात्र चोरुन विक्री करण्याचा प्रयत्न केला. महापालिकेची वाहने येताच त्यांची पळापळ सुरु होती. अनेक ठिकाणी भाजीपाला, फुले, खाद्यपदार्थांचे साहीत्य पथकांनी जप्त केले. शहरातील शनिपेठ भागात, इस्लामपुरा भागात गल्ल्यांमध्ये अनेक ठिकाणी हॉकर्सनी केलेले पक्के ओटे अतिक्रमण विभागाच्या पथकाने तोडून टाकलेत. त्यानतंर काही वर्षानुवर्षे असलेल्या टपर्‍या देखिल या मोहीमेत काढून जप्त करण्यात आल्यात. यानतंर शनिपेठेतील भंगार विक्री करणा र्‍यांचे शेड व ओटेही तोडण्यात आले.