पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत विक्रेत्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत अनधिकृत हातगाड्या, स्टॉल, टप-या आणि साहित्य जप्त करण्यात आले. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील निगडी, यमुनानगरातील थरमॅक्स चौक ते टिळक चौक रस्त्यालगतच्या पदपथावरील हातगाडी आणि टप-यांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये तीन हातगाडी, दोन लोखंडी टप-या जप्त करण्यात आल्या. ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे हद्दीत चिखली – कुदळवाडीतील कारवाईत चारचाकी आणि चारचाकी आणि तीन चाकी वाहनांचे टायर, टायर डिस्क, हातगाडी, लोखंडी टपरी, लोखंडी बाकडे, खुर्च्या, प्लास्टिक टेबल, प्लास्टिक कॅरेट जप्त करण्यात आले. ‘ह’ व ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पिंपळेगुरव आणि संभाजी परिसरातील काटेपुरम चौक ते लक्ष्मी चौक, साई चौक ते फेमस चौक येथे कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये हातगाड्या, जाहिरातीचे फलक, पानटपरी, फरशी वायफर, एक लोखंडी वजनकाटा, लोखंडी टेबल, जाळी, स्टुल आणि इतर लोखंडी साहित्य, जाहिरात, लोखंडी टपरी, लोखंडी बाकडे, खुर्च्या, प्लास्टिक टेबल, प्लास्टिक केरेट जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण नियंत्रण आणि निर्मुलन विभागाचे सहशहर अभियंता राजन पाटील यांचा मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंत्यानी, अतिक्रमण पथकाने केली.