पिंपरी-चिंचवड :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काळेवाडी, रहाटणी नखातेवस्ती येथील रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम धारकांना कुठल्याही प्रकाराची नोटीस न देता विभागाचे अधिकारी आज (गुरुवारी) कारवाईसाठी आल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी गोंधळ घातला. यावेळी संतप्त नागरिकांनी कारवाईसाठी आलेल्या पथकावर दगडफेक करत आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला. त्यामुळे या परिसरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रहाटणी नखातेवस्ती येथील विकास अनधिकृत बांधकाम धारांकाना कारवाई करण्याअगोदरची 24 तासापूर्वीची नोटीस देण्यात आली नाही. नोटीस न देता पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक गुरुवारी सकाळी कारवाईसाठी आले. नोटीस न देता कारवाई करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. तसेच गोंधळ घातला. अतिक्रमण पथकाच्या ‘जेसीबी’वर दगडफेक केली. काही नागरिकांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे, प्रत्यक्षदर्शिने सांगितले. त्यामुळे या परिसरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, याबाबत महापालिकेच्या अधिका-यांशी संपर्क साधला असता. तो होऊ शकला नाही.