जळगाव । अतिक्रमण विभागाच्या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले साहित्य पहिल्या तीन वेळेस दंड आकारून परत करण्यात यावे असा ठराव करण्यात आला आहे. तो हॉकर्स चौथ्यांदा पुन्हा आढळल्यास जप्तीची कारवाई करावी असा ठराव करण्यात आला आहे. परंतु, अतिक्रमण विभागाकडून यानुसार कारवाई करण्यात येत नसल्याची तक्रार हॉकर्स बांधवांनी महापौर ललित कोल्हे यांच्याकडे केली होती.
मनपा संकुलांमध्रे एल.के. फाऊंडेशनतर्फे डस्टबीन
यानुसार अतिक्रमण विभागाची बैठक महापौर ललित कोल्हे यांनी त्यांच्या दालनात बोलवली होती. यावेळी अतिक्रमण अधिक्षक एच.एम. खान यांच्यासह अतिक्रमण विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अतिक्रमण विभागातील कर्मचारी कारवाई केल्यानंतर जप्त केलेले साहित्य पावती न देता थेट साहित्य जप्त केल्राने हॉकर्सचे नुकसान होत आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाने या ठरावाची अंमलबजावणी करावी अशा सूचना देण्यात आल्या. दरम्यान, शहरात सोमवारपासून स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर, फलक, पोस्टर तातडीने काढण्याचे आदेश महापौर कोल्हे यांनी दिले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत एल.के. फाऊंडेशनतर्फे शहरातील व्यापारी संकुलांमध्ये डस्टबीन देण्यात येणार आहेत. तसेच प्रमुख मार्ग व चौकांमधील 100 भितींवर स्वच्छतेचा संदेश देणारे चित्र रंगविण्यात येणार असल्याची माहिती महापौर ललित कोल्हे यांनी दिली.