अतिक्रमितांना पर्यायी जागा देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेणार

0

आमदार संजय सावकारे ; वरणगाव रस्ता कामाचे भूमिपूजन

भुसावळ : पंधरा वर्षांपासून शहराचा विकास खुंटला होता मात्र भुसावळकरांनी भाजपाला एकहाती सत्ता देऊन परीवर्तन घडवले. नागरीकांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती आम्ही करीत आहोत, पथदिव्यांसह रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लावण्यात आला तर आगामी काळात विकासकामांचा धडाका सुरूच राहील, अशी ग्वाही देत रेल्वे पंधरा बंधला भागातील झोपडपट्टी भागातील अतिक्रमितांसह उत्तर भागातील अतिक्रमितांना पर्यायी जागा देण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका असल्याचे आश्‍वासन आमदार संजय सावकारे यांनी येथे दिले. वरणगाव रस्त्याच्या कामाचे त्यांच्या हस्ते रविवारी भूमिपूजन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. प्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्यासह भाजपाचे विविध नगरसेवक व पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.