अतिक्रमित शेतजमिन नियमित करण्याची मागणी

0

बोदवड । तालुक्यातील आमदगाव येथील मागासवर्गीय भुमिहीन लोकांनी फरकांडे शिवारात अतिक्रमण जमिन 1977-87 पासून गट क्रमांक 238 कसत असून ही शेतजमिन भुमिहीन लोकांच्या नावे नियमित करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव गुरचळ यांनी मंगळवार 25 रोजीपासून तहसिलसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. या आमरण उपोषणास अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शविला असून आमदगाव येथील महिला, पुरुष सुध्दा उपोषणास बसले आहे.

उपोषणात यांनी घेतला सहभाग
यास अनिल गुरचळ, विठ्ठल गुरचळ, निना गुरचळ, तुळशीराम गुरचळ, लहानू तायडे, पंडीत बोदडे, भगवान गुरचळ, जना सावळे, छत्राबाई वानखेडे, जयंताबाई निकम, सुशिला गुरचळ, अनुसया कोळी, धनाबाई पारधी, दराबाई बोदडे, चंद्रभागा तायडे, मोहन परदेशी, विलास खोंड, सिध्दार्थ तायडे, प्रकाश तायडे आदींनी पाठिंबा दर्शविला आहे.