अतिदक्षता विभागातील वातानुकूलित मशिन बंद

0

अलिबाग । रायगड जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील वातानुकलित यंत्र गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागातील रुग्णांना पंख्याची हवा खावी लागत असून सार्वजनिक बांधकाम विभाग व रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करीत असून रुग्णांचे हाल होत आहेत. जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात अतिगंभीर रुग्णांना ठेवले जाते. हा अतिदक्षता विभाग पुर्णपणे वातानुकलित आहे. मात्र 13 सप्टेंबरपासुन वातानुकलित यंत्र बंद असल्याने रुग्णांचे व कर्मचार्यांचे हाल होत आहेत.

याबाबत अतिदक्षता विभागातील कर्मचार्यानी रुग्णालय प्रशासनाला कळविले आहे. तर जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे सार्वजनिक बांधकामच्या इलेक्ट्रीशन विभागाला 4 दिवसांपासुन रुग्णालयाचे इलेक्ट्रीशन चव्हाण यांनी कळविलेले आहे. मात्र अद्याप बांधकाम विभागाकडू दखल घेतलेली नाही. सार्वजनिक विभागाचे इलेक्ट्रीक विभागाचे बनसोडे यांनी 17 सप्टेंबरला ठेकेदार येणार असुन तात्पुरते वातानुकलित मशिन सुरु करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर रुग्णालयासाठी नविन कॉम्प्रेसर घेण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे वर्षभरापासुन अर्ज केलेले आहेत. मात्र कामाचे जॉब कार्ड नसल्याने अजुन कामाची वर्क ऑर्डर काढण्यात आलेली नाही. पंरतू नविन कॉम्प्रेसरसाठी पाठपुरावा करणार असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

अतिदक्षता विभागाचे दोन वर्षापुर्वी नुतनिकरण करुन पुर्ण विभाग वातानुकलित केला आहे. यासाठी दोन कॉम्प्रेसर बसविण्यात आले होते. मात्र यातील एक कॉम्प्रेसर मध्ये मध्ये बंद पडत होते. पण आता दोन्हीही कॉम्प्रेसर बंद पडल्याने अतिदक्षता विभागातील वातानुकलित मशीन बंद पडल्या आहेत.