Attempt to set fire to a married woman protesting the excesses in Bhadgaon भडगाव : शहरातील एका भागातील विवाहितेच्या घरात अनधिकृत प्रवेश करीत अज्ञाताने बळजबरीने करून अतिप्रसंगाचा प्रयत्न केला मात्र त्यास विरोध करताच संशयीताने विवाहितेला पेटवण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना बुधवार, 23 नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी भडगाव पोलिसात एका 50 वर्षीय अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
भर दिवसात अतिप्रसंगाचा प्रयत्न
बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील एका भागातील 47 वर्षीय विवाहितेचा अज्ञात 50 वर्षीय अनोळखी पुरूषाने विनयभंग करीत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तसेच पीडीतेने त्यास विरोध करताच आग पेटीने पेटवून देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अंगात चॉकलेटी तपकिरी रंगाचा शर्ट, हिरवट पॅट, पायात बूट, बारीक दाढी अशा वर्णनाच्या 50 वर्षीय अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.