पुणे : शहरी नक्षलवादी करवाईवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना देखील पत्रकार परिषद घेणारे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि पुणे पोलीस आयुक्तांना निलंबित करा, अशी मागणी राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे आज पुण्यात आगमन झाले, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. सनातनसारख्या प्रवृत्तीला सरकारचं पाठबळ असून सनातनवरील कारवाईपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही विखे पाटील यांनी यावेळी केला.