जळगाव । सन2016-2017 मध्ये खासगी माध्यमिक शाळांमधील संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या 65 शिक्षकांची यादी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. काही शिक्षकांना आक्षेप असल्यास त्यांच्याकडून आक्षेप नोंदविण्यात आले होते. या यादीबाबत आक्षेप असलेल्या शिक्षकांची सुनावणी मंगळवारी 6 रोजी सकाळी 11 वाजता ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ठेवण्यात आली आहे. संच मान्यतेनंतर एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत आयुक्तांचे परिपत्रक मुख्याध्यापकांना देण्यात आले होते. यात 2016-2017 च्या संचमान्यतेनुसार आपल्या शाळेत अतिरिक्त ठरलेल्या प्रपत्र ’अ’मध्ये सादर केलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या 65 शिक्षकांची यादी शनिवारी 3 रोजी प्रसिद्ध करून ती शिक्षण विभागात लावण्यात आली आहे.