अतिरेकी हल्ल्यानंतरही पोलिसांकडून निकृष्ट दर्जाची बॉम्बसुटची खरेदी

0

मुंबई | मुंबईत २६ नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर शासनाने बॉब शोधक व नाशक पथकासाठी मे. टेक्नोट्रेड इंपेक्स प्रा.लि. कंपनीने निकृष्ट दर्जाच्या बॉम्ब सूट्सचा पुरवठा केला अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तर तासात लेखी उत्तरात दिली आहे. यासंदर्भात पोलीस महासंचालक कार्यालयातील नऊ पैकी 3 अधिकारी व कर्मचा-यांपैकीएका कर्मचाऱ्याला शिक्षा झाली तर दोन अधिका-यांची चौकशी चालू आहे असेही या लेखी उत्तरात म्हटले आहे.

भाजप सदस्य अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात प्रश्न दिला होता.आपल्या सविस्तर लेखी उत्तरात मुख्यमंत्री म्हणतात, एकूण 82 बॉम्बसूटस् खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली होती.सदर कंपनीविरुद्ध कुलाबा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. कंपनीने 82 बॉम्ब सूट पैकी 46चीनमधील मे. बीजिंग अॅनलॉग टेक अॅन्ड ट्रेड कंपनी तसेच उर्वरित 36 सूट्स साऊथ आफ्रिका येथील मे. सेविअर डायग्नोस्टिक्स एसए कंपनी यांच्याकडून आयात करण्यात आले. अमेरिका,चीन, दक्षिण आफ्रिका या देशातही सदर गुन्ह्याचा तपास होणे आवश्यक असल्याने त्यासाठी लेटर रोगॅटरी पाठविण्याची कार्यवाही सूरू आहे. सदर प्रक्रिया क्लिष्ट असल्याने तपास पूर्ण करण्यास विलंब होत आहे. बीलापोटी अदा करण्यात आलेली रक्कम रु.6,21,69,120-रू. व्याजासह परत मिळणेबाबत उच्च न्यायालयात कंपनीविरुद्ध दावा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशी अहवालाआधारे गृह विभगातीस 3 अधिकारी -कर्मचारी यांची विभागीय चौकशी पूर्ण करण्यात आली. एका कर्मचाऱ्यास शिक्षा झाली तर दोन अधिका-यांवरील कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.