अतिवृष्टीमुळे ५ रेल्वे गाड्या रद्द ; प्रवाश्यांचे हाल !

0

मुंबई: राज्यभरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई आणि परिसराला जोरदार पावसाचा फटका बसला आहे. २००५ सारखी परिस्थिती मुंबईत निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचाच फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. अतिवृष्टीमुळे आज पाच रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर ६ रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. रेल्वेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

काल ‘महालक्ष्मी’ एक्स्प्रेस तब्बल बारा तास पावसामुळे एकाच ठिकाणी अडकून होती. त्यातील प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान अद्यापही मुंबईत जोरदार पाऊस सुरु असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.