मुंबई । यावर्षी मोसमी पावसाने सुरुवात चांगली केल्यानंतर काही काळ ओढ दिली मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्थिरावलेल्या व अधिक प्रमाणात झालेल्या पावसाने त्याचबरोबर वीज कोसळण्याच्या घटना घडल्या; यात एकंदर 81 जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. सर्वात जास्त मृत्यू हे नांदेड जिल्ह्यात झाले आहेत. तेथे 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर बीड येथे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात यावर्षी चांगला झाल्याचे समाधान व्यक्त केले जात असतानाच राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने 1 जून ते 3 जुलैपर्यंतच्या दिलेल्या आकडेवारीतून राज्यातील पाऊसबळी आणि अंगावर वीज पडून मृत्यु झालेल्यांची संख्या उघड झाली आहे. 1 जून ते 3 जुलैपर्यंतची आहे.
राज्यात पाऊस आणि वीज पडून मृत्यु झालेल्यांची सर्वाधिक संख्या नांदेड जिल्ह्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेथे 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर बीड येथे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीने अमरावती जिल्ह्यात 6, अकोल्यात 1, यवतमाळ येथे 2, बुलडाण्यात 3, वर्ध्यात 1, चंद्रपूरला 5, भंडार्यात 1, गडचिरोलीत 5, गोदिंयात 3, औरंगावादमध्ये 2, जालन्यात 1, नाशिकमध्ये 6, जळगावमध्ये 3, अहमदनगरमध्ये 2, नंदूरबारमध्ये 2जणांचा मृत्यु झाला.
मुंबईत तिघांचा मृत्यू
मुंबईतही जोरदार पावसाचा प्रभाव जाणवला त्यामुळे तिघांचा मृत्यू झाला. पालघरमध्ये 1, ठाण्यात 4, रायगडमध्ये 6, सोलापूरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 75 जनावरांचा मृत्यू अतिवृष्टीने झाला आहे. त्याखालोखाल जालन्यात 2, लातूरमध्ये 5, अमरावती जिल्ह्यात 8, यवतमाळ येथे 2, बुलडाण्यात 10 जनावरांचा मृत्यू झाला आहे.