उरण । देशात वरचेवर काश्मीर सारख्या ठिकाणी वाढलेल्या अतिरेकी कारवायांच्या पार्श्वभूमीवर अतिसंवेदन शील म्हणून ओळखल्या जाणार्या उरणच्या ओएनजीसी प्रकल्पाला अगदी खेटून खासगी जमिनीत प्लॉटिेग करण्याच्या उद्देशाने मागील काही महिने खोदाई आणि मातीचे सपाटीकरण झाले असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे तालुका किंवा जिल्हा प्रशासनाकडून खोदाई साठी कोणतीही परवानगी ना घेता या ठिकाणी खोदाई झाल्याची बाब उरण सामाजिक संस्थेने जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या खोदाई झालेल्या आणि सपाटीकरण केल्या गेलेल्या ठिकाणाची पाहणी मागील आठवड्यात करण्यात आली मात्र त्यालाही आता सुमारे पाच दिवस होऊन गेल्यावरही त्याचा प्रशासनाकडून लिहिला जाणारा साधा अहवालही आजच्या तारखेपर्यंत तरी तय्यार झालेला नसल्याची सनसनाटी माहिती हाती आली आहे. या प्रकारामुळे ओएनजीसी सारख्या देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेल्या प्रकल्पाची सुरक्षितताच धोक्यात आली असून याबाबत लवकरच पंतप्रधान कार्यालय, पेट्रोलियम मंत्री आणि मा राष्ट्रपती महोदयांना साद घालण्याचा निर्णय उरण सामाजिक संस्थेने घेतला आहेत. ओएनजीसी सारख्या प्रकल्पाला अगदी खेटून नागरी वस्ती अभी राहिल्यास प्रकल्पाला धोका होणार नाही याची कोण शाश्वती देणार असा सवाल करतानाच पत्रव्यवहाराबरोबरच प्रधानमंत्र्यांच्या पोर्टलवर ही बाब आम्ही प्रधानमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याची माहिती उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, माजी अध्यक्ष भूषण पाटील आदींनी बोलताना दिली आहे.
या ठिकाणी होत असलेल्या बेकायदा माती उत्खनाबाबत उरण सामाजिक संस्थेने शासकीय स्तरावर पत्रव्यवहार केला असल्याचा राग येऊन उत्खनन करणार्या कंत्राटदार वामन तांडेल आणि त्यांच्या मुलांनी सामाजिक संस्थेचे सचिव संतोष पवार आणि उरण पूर्व विभाग अध्यक्ष रुपेश पाटील यांना माराहण करण्याची धमकी दिली होती त्याचा निषेध नोंदविण्यासाठी येत्या मंगळवारी उरण पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली जाणार आहेत याबाबतच्या तयारीसाठी घेण्यात आलेल्या पाणदिवें येथील बैठकीत या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी झालेल्या चर्चवेतूनच मुळात ओएनजीसी सारख्या अतिसंवेदनशील प्रकल्पाला अगदी खेटून असलेल्या ठिकाणी कोणी प्लॉटींग करूच कसा शकतो असा सवाल उपस्थित झाला आहेत त्यातूनच आता ओएनजीसी प्रकल्पाला असलेल्या धोक्याबाबत थेट दिल्ली दरबारी पत्रव्यवहार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे
लक्ष देण्याची गरज
उरण तालुक्यात असलेल्या अतिसंवेदनशील प्रकल्पाच्या यादीत उरणाचा ओएनजीसी प्रकल्प आणि नेव्हीचे शस्त्रागार हे दोन अतिशय महत्वाचे प्रकल्प म्हणून ओळखले जातात. या दोनपैकी एखाद्या प्रकल्पातील छोट्यात छोटी ठिणगी देखील संपूर्ण उरण तालुक्याचा खाक घडवू शकते. त्यामुळेच या प्रकल्पाच्या सुरक्षिततेकडे सर्वांनीच सजगपणे लक्ष देण्याची गरज आहे या निमित्ताने नेव्ही ला चारही बाजूने कुंपण आहे आणि त्या कुंपणाच्या ही कितीतरी आतमध्ये प्रत्यक्ष काम चालत असते. त्यामुळे त्या ठिकाणी सहसा कोणाताही धोका घडण्याची शक्त्यता नाही मात्र ओएनजीसी प्रकल्प थेट रस्त्यावरून दिसत आहे. या प्रकल्पात देशविघातक शक्ती कोणताही अनर्थ घडवण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.
प्लॉटिंग करण्याच्या उद्देशाने सपाटीकरणाचे काम सुरू
या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून द्रोणागिरी डोंगराच्या उत्तर बाजूस असलेल्या एका खासगी जमिनीत भविष्यात प्लॉटिंग करण्याच्या उद्देशाने सपाटीकरणाचे काम सुरू आहे. हे करताना ज्या द्रोणागिरी डोंगराच्या उत्खननाला यापूर्वीच जिल्हाधिकारी रायगड यांनी बंदी घातली आहे त्या ठिकाणी बेधडकपणे उत्खनन करण्यात आले. या उत्खननाला आक्षेप घेणार्या उरण सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांना अगदी जीवे मारण्याच्या धमक्या ही देण्यात आल्या ज्याबाबत उरण पोलिसांनी केवळ अदखलपात्र अशा आशयाची नोंद केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संतापलेल्या उरण सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आता ओएनजीसी प्रकल्पाला लागून होऊ घातलेल्या प्लॉटिंग मुले प्रकल्पालाच कसा धोका होणार आहे याची माहिती थेट थेट दिल्लीत पोहोचवण्याची रणनीती आखली आहे पीएमओ कार्यालय, पंतप्रधानांचे ट्विटर अकाऊंट आणि देशाच्या महामहिम राष्ट्रपती महोदयापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा निर्धार उरण सामाजिक संस्थेने केला आहे त्यामुळे ओएनजीसी प्रकल्पाला लागून असलेल्या खासगी जमिनीत होणार्या उत्खननाकडे कानाडोळा करणार्या तालुका आणि जिल्हा प्रशासनाला आता थेट दिल्लीला उत्तरे द्यावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.