जळगाव । प्रसुति झाल्यानंतर अतिरक्तस्त्राव होवून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी पहाटे घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भाग्यश्री राहुल कोळी (वय-20) ही विवाहिता प्रसुतिसाठी माहेरी शिवाजीनगर येथे आली होती. तिला खाजगी रूग्णालयात गुरूवारी प्रसुतिसाठी दाखल करण्यात आले होते.
शनिवारी पहाटे खाजगी रूग्णालयात त्यांची प्रसुति झाली. परंतू पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास महिलेची अतिरक्तस्त्रावामुळे प्रकृति खालावल्याने तिला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले.डॉक्टरांनी महिलेची तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली.