अतुल मुळे यांचे रक्तदानाचे दीड शतक!

0

जळगाव : रक्तदानातील दानशूर, समाजसेवी, निस्पृह व्यक्तिमत्व अतुल अनंत मुळे हे नियमितपणे रक्तदान करून यापूर्वीच जिल्ह्यातील पहिले शतकी रक्तदाते म्हणून सन्मानित झाले होते. त्यानंतरही त्यांनी नियमित रक्तदानाचा वारसा जपत आज 150 वे रक्तदान करून आपल्या रक्तदानाचे विक्रमी दीडशतक पूर्ण केले. वयाच्या 18 व्या वर्षापासून दर तीन महिन्यांनी इंडियन रेडक्रॉस रक्तपेढीतच रक्तदान करीत आहेत.

या मान्यवरांच्याहस्ते झाला सत्कार
इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलीत रक्तपेढीत आपले 150 वे रक्तदान समर्पित करतेवेळी उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष गनी मेमन, विनोद बियाणी, घनश्याम महाजन, राजेश यावलकर, बी.एच.मोरे, डॉ.पी.बी.जैन, कर्मचारी वर्ग आणि रक्तपेढी चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी यांनी अतुल मुळे यांचे मनपूर्वक अभिनंदन करीत सन्मानचिन्ह, गौरवपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.