अत्तरदे यांची आयुक्तांकडे मागणी

0

जळगाव । जिल्ह्यातील खान्देश शिक्षण मंडळ अमळनेर संचलित विविध माध्यमिक शाळांमध्ये 2013-17 या कालावधीत अनधिकृतरित्या पदभरती करण्यात आलेली आहे.

सदर भरतीस तात्कालीन शिक्षणाधिकारी यांनी जाहीरातीस अथवा भरतीस कोणतीही परवानगी दिलेली नसतांना तसेच शासनाने 2012 पासून भरतीस बंदी असतांना संस्थाचालकांनी शिक्षणविभागाच्या सहाकार्याने पदभरती केली असल्याचे आरोप करत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासह लिपीकाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी शिक्षण आयुक्त यांच्याकडे जिल्हा परिषद तथा शिक्षण समिती सदस्या माधुरी अत्तरदे यांनी केली आहे. शिक्षण संचालक, उपसंचालक यांच्याकडे देखील त्यांनी निवेदनाचे पत्र पाठविले आहे. या अगोदर जिल्हा परिषदेचे सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे देखील तक्रार करण्यात आली आहे. 23 शिक्षकांना विविध संस्थेत भरती करण्यात आले असून त्यांच्याकडून लाखो रुपये घेण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली आहे.