अत्याचाराच्या घटनेतील नराधमांना फासावर लटकवा!

0

भामेर । जम्मु काश्मीरातील कठुआ येथील बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधमांचा निषेध करत निजामपूर-जैताणे येथील मुस्लीम समाज बांधवांतर्फे निजामपूर ते साक्री तहसिल कार्यालयापर्यंत मोटार सायकल रॅली काढण्यात आली. अत्याचार करणार्‍या नराधमांना तात्काळ फासावर लटकविण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन यावेळी जमावाच्यावतीने शिष्टमंडळातर्फे तहसिलदार यांना देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
निवेदन देतांना, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पोपट सोनवणे, ग्रा.प. सदस्य सलीम पठाण, लियाकत सैय्यद, खुदाबक्ष शेख, पं.स. सदस्य वासुदेव बदामे, जाकीर तांबोळी, लिकायत तांबोळी, साजीद पठाण, अनिस पठाण, युसूफ सैय्यद, सादीक शेख, नासीर शेख, आवेश सैय्यद, मुन्ना सैय्यद, अकिब सैय्यद, सादीक तांबोळी, बबलु शेख उपस्थित होते.