A minor girl who came to Nashirabad area for sugarcane cutting was assaulted : The victim was seven months pregnant : A young man was arrested from Jalna district नशिराबाद : ऊस तोडीनिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातून नशिराबाद परीसरात आलेल्या कुटुंबातील अल्पवयीन 17 वर्षीय युवतीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार करण्यात आला व त्यातून पीडीता सात महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथील रहिवासी विशाल तानाजी पवार याच्या विरोधात अत्याचार, अॅट्रासिटी व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ओळख वाढवून केला अत्याचार
औरंगाबाद जिल्ह्यात एक कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून नशिराबाद परीसरात ऊस तोडीनिमित्त आल्यानंतर आरोपी विशाल पवार याने कुटुंबातील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीशी ओळख वाढवली व नंतर विश्वास संपादन करीत तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवत नशिराबाद परीसरात वारंवार अत्याचार केला. त्यातून पीडीता सात महिन्यांची गरोदर राहिली. 4 नोव्हेंबर 2021 ते 31 मे 2022 दरम्यान हा प्रकार घडला.
आरोपीला पोलिसांकडून अटक
अल्पवयीन तरुणी सात महिन्याची गर्भवती राहिल्याचा प्रकार उघड झघाल्यानंतर पीडित युवतीच्या आईने सोमवार, 12 रोजी नशिराबाद पोलिसात धाव घेत पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे घडला प्रकार कथन केल्यानंतर आरोपी विशाल तानाजी पवार (धावडा, ता.भोकरदन) याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपीला अटक करण्यात आली. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे करीत आहेत.