अत्याचारी शालक-मेहूणा 24 तासात जेरबंद

0

जळगाव : भुसावळ येथील अल्पवयीन तरूणी मित्रासह फिरण्यास गेली असतांना दोन अज्ञात इसमांनी बंदूकीचा धाक दाखवून रविवारी अकलुद शिवारात पिळोदा रस्त्यालगत अत्याचार केला होता. जळगाव येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी अवघ्या 24 तासात संशयित आरोपींना जेरबंद केले. आरोपीकडून बंदूक व त्या मुलाचा चोरीला गेलेला मोबाईल ही जप्त करण्यात आला आहे. आरोपी हे मेहुणेसाले असून ते अकलूद येथील रहिवाशी आहे. जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना संशयितांची गुप्त माहितीद्वारांमार्फत माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी आपल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना सुचना दिल्या. यातच मिळालेल्या माहिती नुसार सपोनि धारबळे, नारायण सोनवणे, मनोहर देशमुख, रमेश चौधरी, मिलींद सोनवणे, रविद्र गायकवाड, योगेश पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारूळे, रवीद्र पाटील, प्रकाश महाजन, लिलाकांत महाले, दत्तात्रय बडगुजर, नारायण पाटील, मनोज दुसाने, सुशिल पाटील, जयंत चौधरी, इद्रीस पठाण, बबन तडवी अशांचे पथक तयार केली. या पथकांनी मिळालेल्या माहितीच्या अधारे रायपुर, गहूखेडा, अंजाळे, विध्यापेपर या भागात सापळे लावले.

बंदूकीचा धाक दाखवून बलात्कार
भुसावळ शहरातील फिल्टर हाऊस रोडजवळील रहिवासी अल्पवयीन तरूणी आपल्या तरूण मित्रासह 1 रोजी संध्याकाळी फिरण्यास गेली होती.अकलुद शिवारातील पिळोदा रोडलगत मोटारसायकल लावून बोतल असतांना दोन अज्ञात तरूणांनी बंदूक लावून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. त्याच्याजवळील मोबाईल व रोख रक्कम घेवून पसार झाले होते. याबाबत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात भाग 5/ गुरन 1/2017 भादवि कलम 394, 376, 341, 34 सह आर्म अ‍ॅक्ट कलम 3/25 व बालकांचे लैंगिक गुन्ह्या पासून सरंक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी सदर गुन्ह्याचा समांतर रित्या तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत होती.

अकलुद येथून केली अटक
रायपुर, गहुखेडा, अंजाळे, विध्यापेपर या भागात सापळे रचल्यानंतर त्यांना यावल तालुक्यातील अकलुद गावात राहणारा किरण वसंत कोळी या संशयिताविषयी माहिती मिळाली पथकाने त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याची विचारपुस केली असता हा गुन्हा त्याचा मेहुणा वासुदेव नारायण तायडे रायपुर ता.रावेर याच्यासोबत केल्याची कुबली त्यांने पथकाला दिली. त्याच्याकडून एअर गन व चोरी केलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीना फैजपुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीना अवघ्या 24 तासाच जेरबंद केल्याबद्दल जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.जालिधर सुपेकर यांनी संपुर्ण टिमचे अभिनंदन केले आहे.