शिरपूर। तालुक्यातून कुवे येथून 15 वर्षीय अल्पवयीन बालिकेला झेंडेअंजन येथील 5 आरोपींनी बळजबरीने पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. दरम्यान, जातपंचायतने दोनदा बैठक घेवून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल न करण्याचा दबाव आणला. यामुळे पिडीत बालिकेच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली. या पिडीत बालकीकेला संशयितांनी वेळोवळो अत्याचार केला. जात पंचायतीकडे पिडीतेच्या वडीलांनी दाद मागितली असता त्यांना संशियांताविरोधात गुन्हा दाखल न करण्याबाबत दबाव आणण्यात आला.
वडीलांकडे पिडीतेस सोडले
आरोपींनी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींशी संपर्क साधल्यामुळे पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे सांगितले. आरोपी घाबरल्यामुळे ते पोलिस ठाण्यात हजर न राहता त्यांनी त्या बालिकेला वाण्यापाणी येथे तिच्या वडिलांकउे सोडून ते पळून गेलेत. गावातील जात पंचायतीने बैठक घेवून या संदर्भात तक्रार न देण्याचा दबाव फिर्यादी सिताराम विजयसिंग पावरा राहणार वाण्यापाणी ता.शिरपूर यांच्यावर टाकण्यात आला.
जीवे ठार मारण्याची धमकी
यानंतर फिर्यादीची 15 वर्षीय चिमुकली कुवे येथे काकांकडे गेली असतांना पुन्हा आरोपींनी तिला 15 जुलै 2017 रोजी बळजबरीने पळूवन नेले. चोपडा तालुक्यातील नांदेड गावातील एका झोपडी वजा घरात 10 दिवस ठेवले. तेथेेही आरोपींनी शारीरिक संबंध ठेवले. परशुराम पावरा हा दारू पिवून लैंगीक अत्याचार तिच्यावर करीत होता. त्या गोष्टीची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. 25 जुलै 2017 रोजी ती बालिका कशीबशी सुटून आई-वडिलांकडे आली. दरम्यान, फिर्यादी सिताराम पावरा याने समाजातील पंच लोकांची बैठक घेतली. या बैठकीत आरोपींकडे पंच लोकांनी तक्रार न करण्याबाबत फिर्यादीवर पुन्हा दबाव टाकण्यात आला. अखेर फिर्यादी पावरा हे पंच लोकांना न जुमानता शिरपूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेत. मात्र तेथे पोलिसांनी दखल घेतली नाही. अखेर पिडीत पित्याने शिरपूर न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशान्वये लैंगीक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 चे कलम 4, भादंवि कलम 76, 363, 366अ, 120ब, 354, 323, 504, 506 व 34 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चाकूचा धाक दाखवून गैरकृत्य
सिताराम विजयसिंग पावरा राहणार वाण्यापाणी ता.शिरपूर यांचा भाऊ कुवरसिंग हा कुवे येथील काठेवाडी यांच्या शेतात रखवालदारीचे काम करतो. त्याच्याकडे सितारामची 15 वर्षाची मुलगी राहत होती. गेल्या दीड महिन्यापूर्वी कुवरसिंग यांच्या झोपडी बाहेरून बालिकेला बळजबरीने गैरकृत्य करण्याच्या हेतून चाकू व तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवून परशुराम झगड्या पावरा, झगड्या पावरा व इतर तीन अज्ञात व्यक्ती सर्व राहणार झेंडेअंजन यांनी पळवून नेले. आरोपींनी कुवरसिंग पावरा यास न जुमानता तिला दुचाकी गाडीवर बसवून नेले. त्या बालिकेला आरोपींनी गुजरात राज्यातील अहमदाबाद व बडोदा येथे 20 दिवस ठेवले.