जळगाव । नाशिक येथे गवळी समाजाच्या चार वर्षीय बालिकेवर अमानुषपणे अत्याचार करणारत आला आहे. नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि आरोपीविरुद्धचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा आणि अशा नराधमास फाशीची शिक्षा होणेकामी सरकारी वकील म्हणुन अॅड. उज्ज्वल निकम यांची तातडीने नियुक्ती करण्यात यावी अशा प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र गवळी समाज संघटना जिल्हा जळगाव यांचे वतीने उपजिल्हाधिकारी तथा पुरवठा अधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
घटनेमुळे समाजात प्रचंड संताप
बालिकेवर अत्याचार प्रकरणात विशेष लक्ष घालून या प्रकरणी संशयिताविरोधात खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येवून त्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी, ही प्रमुख मागणी होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील गवळी समाजात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. यावेळी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप गवळी, निंबा जानगवळी, नारायण घुगरे, राजेंद्र जानगवळी, पिरनदादा पिरनाईक, संतोष गवळी, अनिल गवळी, उमेश गवळी, दिपक गवळी, लवेश घुगरे, कृष्णा गवळी, हेमंत गवळी, भरत गवळी, बाबा गवळी, कुणाल गवळी, तसेच गवळी समाजातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तात्काळ घटनेचा तपास करून दोषींना शिक्षा देण्यात यावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.