अत्याचार करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यावर कारवाईची मागणी

0

भुसावळ। दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यावर खटला दाखल करुन हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा व पिडीत मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी विश्‍वकर्मा सुतार समाजातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात समाजबांधवांनी उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांची भेट घेवून त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.

कायमस्वरुपी सेवेतून निलंबित करण्यात यावे
मोहाडी येथे अल्पवयीन मुलगी आपल्या घराबाहेर भांडी घासत असतांना पोलीस कर्मचारी गोरख शेखरे याने तिच्यावर अमानुष अत्याचार केला व तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे या घटनेचे गांभिर्य लक्षात घेता पोलीस कर्मचारी शेखरे यास कायमस्वरुपी सेवेतून निलंबित करण्यात यावे. तसेच त्याच्यासह त्याच्या सहकार्यांवरदेखील कठोर कारवाई करण्यात येवून फाशीची शिक्षा देण्यात यावी.

कुटुंबास आर्थिक मदत मिळावी
हा खटला जलद न्यायालयात चालविण्यात येवून अत्याचारपिडीत मुलीस न्याय मिळवून देण्यात यावा तसेच पिडीत मुलगी आणि त्यांच्या कुटुंबियांचे कधीही न भरुन येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने कुटुंबास तातडीची आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केेली असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

यांनी दिलेे निवेदन
याप्रसंगी निवेदन देतांना अध्यक्ष राजेेंद्र दांडगे, सचिव प्रविण वळसकर, किरण सोनवणे, खजिनदार अशोक रुले, सहसचिव प्रविण बुंदेले, कायदेशिर सल्लागार अ‍ॅड. दत्तात्रय खैरनार, प्रसिध्दी प्रमुख सुधीर शेगोकार, प्रदिप अहिरे, जितेेंद्र काळे, जनसंपर्क प्रमुख संजय अंदुरकर, दिनेश राजगिरे, दिपक वाघ, सुनिल जाधव, हरिष रुले, दिपक साळुंके, अतुल अहिरे, नरेंद्र मिस्त्री, राजेंद्र सोनवणे, राजेंद्र पराडे, विजय जमदाळकर, गौरव बावस्कर आदी समाजबांधव उपस्थित होते.