अक्कलकुवा – शहरालगत असलेल्या सोरापाडा येथील 8 वर्षीय बालिकेवर नराधमाने बलात्कार करून खून केल्याची घटना २२ जानेवारी रोजी घडली होती. या घटनेबाबत आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. दरम्यान २४ जानेवारी २०१९ रोजी सकाळी गावातील ग्रामस्थांनी अक्कलकुवा तहसिल कार्यालयावर निषेध मोर्चा काढत आरोपीस कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे आरोपी कमलसिंग करतारसिंग सिकलीकर (रा.सोरापाडा, वय 30) याने एका आठ वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्घुण खून केला. सदर बालिका संध्याकाळी ४ पासून घरातून बेपत्ता होती. तिच्यावर रात्री ८ वाजेच्या सुमारास बलात्कार करुन बालिकेच्या तोंडात कागदाचा गोळा कोंबुन तोंड बांधून आरोपीने हत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर तात्काळ आरोपीला अटक करण्यात आली. पीडीत बालिकेचे आई वडील उत्तरप्रदेशचे असुन सुमारे सात वर्षापासुन मजूरीसाठी अक्कलकुवा येथे वास्तव्यास होते. मयत बालिकेच्या वडीलांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलिस स्टेशनला आरोपी कमलसिंग सिकलीकर याच्याविरोधात लैंगिक अत्याचारपासुन बालकांचे संरक्षण गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास अक्कलकुवा पोलिस अधिक्षक एम.डी.डांगे व पोलिस कर्मचारी तपास करीत आहे. दरम्यान घटनेच्या दूसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपासुन घटनास्थळापासुन शेकडो संतंप्त नागरीकांनी तहसिल कार्यालयावर धडक निषेध मोर्चा काढून मोर्चेकऱ्यानी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली.